Video : पुणे-शिर्डी प्रवास आता हेलिकॉप्टरने अवघ्या 40 मिनिटांत! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पुण्यावरून अवघ्या चाळीस मिनिटांत शिर्डीमध्ये साईबाबा यांचे दर्शन घेऊन थोड्या वेळातच पुण्यातही पोहोचू शकतो. ब्लेडने पुणे-मुंबई, पुणे-शिर्डी आणि शिर्डी-मुंबई मार्गावर प्रवाशांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे.  

पुणे : पुण्यावरून शिर्डी प्रवास आता फक्त 40 मिनिटांमध्ये शक्य झाला आहे. ब्लेड या कंपनीने पुण्यातून शिर्डीसाठी सुरू केलेल्या हेलिकॉप्टर सर्व्हिसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यावरून अवघ्या चाळीस मिनिटांत शिर्डीमध्ये साईबाबा यांचे दर्शन घेऊन थोड्या वेळातच पुण्यातही पोहोचू शकतो. ब्लेडने पुणे-मुंबई, पुणे-शिर्डी आणि शिर्डी-मुंबई मार्गावर प्रवाशांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे.

सुमारे पंधरा ते सोळा हजार रुपये दरात प्रवासी हा प्रवास करु शकतात. पुण्यातील गरुड दांपत्याला त्यांच्या मुलीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पुणे- शिर्डी ट्रिप स्पॉन्सर केली आहे. तर कॅप्टन नितीन वेलडे यांच्यामुळे हा प्रवास सुखकर झाला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Shirdi helicopter service started travel in 40 mins