Violent Attack on Youth Near Shirur Highway
Sakal
शिरूर : पुणे - अहिल्यानगर महामार्गावरील बोऱ्हाडे मळ्यानजीक (ता. शिरूर) सात - आठजणांच्या टोळक्याने पाठलाग करून एका तरूणाला बेदम मारहाण केली. कोयता, तलवार आणि बंदूक नाचवित या टोळक्याने दहशत निर्माण केल्याने परिसरात घबराट पसरली. आज दुपारी तीन ते साडेतीन च्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात अजय माणिक घेगडे (वय २०, रा. राजापूर माठ, ता. श्रीगोंदे, जि. अहिल्यानगर) हा गंभीर जखमी झाला असून, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.