esakal | Shirur: ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपालांच्या हस्ते सन्मान

शिरुर : ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्हावरे : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयाअंतर्गत नेहरू युवा केंद्र संगठण, महाराष्ट्र व गोवा, यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार पुणे जिल्हयातील न्हावरे (ता. शिरुर) येथील ग्रामीण तंत्रज्ञान या संस्थेला राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींनाही गौरविण्यात आले.

युवा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबन कार्यासाठी उत्कृष्ट संस्था म्हणून देण्यात आलेला हा पुरस्कार मुंबईत राजभवनात झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष गीताराम कदम यांनी स्वीकारला. एक लाख रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र व गोवा राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरे, उपसंचालक यशवंत मानखेडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: इंदापूर नगरपरिषदेमार्फत कचरा अलग करो अमृतमहोत्सव : अंकिता शहा

याप्रसंगी समाजोपयोगी व विधायक पत्रकारितेबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष व दै.‘सकाळ’चे बातमीदार शरद पाबळे, तसेच ॲग्रोवनचे बातमीदार संदीप नवले यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. तर शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स रिसर्च पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, सी. टी. बोरा कॉलेजचे प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते, तसेच सागर हेमाडे, रसिका कुलकर्णी, सुज्ञान मानखेडकर, राज सुनिल रनधिर, विकास कात्रे यांनाही विविध क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नेहरू युवा केंद्रे, तसेच ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेसह विविध पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करताना युवकांमध्ये देशाभिमान तसेच विधायक, सामाजिक कार्याबद्दल जागृती, तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती गावांपर्यंत पोहोचविण्यासाठी नेहरू युवा केंद्रे, संस्था व व्यक्ती चांगले कार्य करीत असल्याचे सांगत यापुढे त्यांनी ग्रामीण तसेच आदिवासी भागांच्या उन्नतीसाठीही कार्य करावे, असे आवाहन केले.

loading image
go to top