Former Shiv Sena Corporators Join BJP, Congress, NCP
sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर यातील ९ नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र, आता गेल्या तीन वर्षात एकएक करून शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करत दुसऱ्या पक्षामध्ये उड्या मारल्या आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एकही नगरसेवकच उरलेला नाही. ‘शिवसेना उबाठा मुक्त पुणे’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.