

Mandar Kivale was seriously injured in an attack outside Shivajinagar District and Sessions Court in Pune. Police suspect a possible connection with the 2025 Shubham Chavan murder case.jpg
esakal
पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात बुधवारी (२५ नोव्हेंबर) भरदुपारी एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न करत कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. मंदार मारुती किवळे (वय ३५, रा. कात्रज) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वीच तो एका खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. त्यामुळे या हल्ल्यामागे जुन्या खुनाच्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एप्रिल २०२५ मध्ये कात्रजमधील शुभम सुभाष चव्हाण याची हत्या झाली होती. या प्रकरणात मंदार किवळे याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.