

Shivajinagar Court Firing Case
esakal
पुणे : शिवाजीनगर न्यायालयासमोर वैमनस्यातून मंदार किवळे याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केल्याप्रकरणात आणखी तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने इंदापूर तालुक्यातील पळसदेव परिसरातून अटक केली. तिघे आरोपी कर्नाटकात पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे एकूण अटक आरोपींची संख्या १० झाली असून एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.