Jewellery Dispute Turns Fatal in Pune, Husband Stabs Wife to Death
Sakal
पुणे
Pune News: दागिन्यांची मागणी करते म्हणून पत्नीची हत्या, चाकूने सपासप वार; पुण्यातील घटनेनं खळबळ..
Haveli murder case shocking Reason: सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून पतीने पत्नीचा खून; वाडेबोल्हाईत खळबळ
केसनंद: सोन्याच्या दागिन्यांची वारंवार मागणी करत असल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीचा चाकूने वार करून खून केल्याची घटना वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे गुरुवारी (ता. २३) रात्री घडली. नम्रता शैलेंद्र व्हटकर (रा. बकोरी, ता. हवेली), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून पती शैलेंद्र प्रकाश व्हटकर यास ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेला लोखंडी चाकुही जप्त केला आहे.

