Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Father Son Dispute Turns Fatal in Pune : श्रावणात दारू पिऊन मटणाची मागणी करणाऱ्या मुलाचा वडिलांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली.
Pune Crime

30-year-old man died after his father allegedly assaulted him

esakal

Updated on

पुणे : श्रावण महिन्यात दारू पिऊन घरी आल्यानंतर मांसाहारी जेवणाची मागणी केल्यावरून झालेल्या वादात वडिलांनी मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना वारजे माळवाडी परिसरात घडली. या मारहाणीत ३० वर्षीय महेश भागवत गायकवाड याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मारहाण करणारे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप असलेली आई पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) यांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com