Pune Sihagad Road:बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्या प्रकरणी अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Pune Sihagad Road News : बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्या प्रकरणी अटक

बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्या प्रकरणी अटक

सिंहगड रस्ता गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण

Pune Sihagad Road Arrested case extortion builder

firing

पुणे- सिंहगड रस्ता परिसरातील आनंदनगर सनसिटी सोसायटीसमोर बांधकाम व्यावसायिकाने मंगळवारी गोळीबार केला मात्र . जयंतीच्या कार्यक्रमाला जास्त वर्गणी कोण देणार, यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला होता. या घटनेला नवे वळण लागले असून, या बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याची तक्रार दिली आहे.

या संदर्भात संतोष सेवू पवार (वय ३५, रा. बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून रमेश बद्रिनाथ राठोड आणि देवा ऊर्फ देविदास सोमनाथ राठोड यांच्यावर सिंहगड रोड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. देवा राठोड याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार यांनी २०१५ मध्ये रोहिदास चोरगे याच्याविरुद्ध वेल्हा पोलिस ठाण्यात खंडणीची तक्रार दिली होती. त्यावरून चोरगे याच्यावर गुन्हा दाखल केला होता. भविष्यात त्याचा त्रास होऊ नये, यासाठी पवार यांनी रमेश राठोड याला मध्यस्थी करण्यास सांगितले होते. त्यात राठोड याने मध्यस्थी केली.

त्यामुळे तो जुलै २०१५ पासून आजपर्यंत सतत भेटून पैशांची मागणी करीत होता. पवार यांनी राठोडला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी पाच ते सहा लाख रुपये वसूल केले. मंगळवारी रात्री गोळीबाराच्या घटनेपूर्वी आरोपींनी पैशाची मागणी करुन मारहाण केली, असे पवार यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.