

Grand Exhibition of 99 Fort Replicas at Sinhagad
Sakal
खडकवासला : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंहगड विभाग यांच्या वतीने सिंहगडावर तीन तोफगाड्यांच्या लोकार्पणानिमित्त ९९ दुर्ग प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन दि. १९, २० व २१ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सिंहगडावरील अमृतेश्वर भैरव मंदिर परिसरात आयोजित केले आहे.