
पुणे : सिंहगड रस्त्यावरील शिवा काशीद चौक ते हिंगणे दरम्यानचा स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या मजबुतीसाठी तपासण्या सुरू आहेत. या तपासण्या दोन दिवसांत पूर्ण होतील, असा दावा प्रशासनाला केला आहे. दरम्यान, या उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नेमके उद्घाटन कधी होणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.