

PMC Hospital
Sakal
धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील महापालिकेच्या कै. मुरलीधर लायगुडे रुग्णालयात कोरोनाकाळात उभारलेला ‘मेडिकल ऑक्सिजन प्लांट’ आज धुळ खात पडून आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही सुविधा निष्क्रिय अवस्थेत आहे. या प्लांट परिसरात झाडी उगवली असून गंजलेले उपकरण, तुटलेल्या अवस्थेतील कुंपण हे सर्व प्रशासनाच्या दुर्लक्षाचा पुरावा देत आहे. यासोबतच प्लांटच्या वापर, ऑडिट रिपोर्ट आणि चालू-बंद नोंदवही सार्वजनिक नाही. त्यामुळे पारदर्शकतेचा मुद्दा अधिक गंभीर ठरतो.