Pune : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ सांडपाण्याचे तळे; नागरिक संतप्त

वारंवार तक्रारी करुन दुरुस्ती होत नसल्याने नागरिक संतप्त
pune sinhagad road Sewage issue traffic jam health
pune sinhagad road Sewage issue traffic jam health sakal

किरकटवाडी : मुख्य सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ असलेल्या कालव्यावरील पुलालगत अक्षरशः सांडपाण्याचे तळे साचले आहे. अनेक दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर साचून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनचालकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे.

सिंहगड रस्त्यावरील दळवी वस्ती येथील सिंहगड रस्त्यावरुन धायरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध असलेली सांडपाण्याची वाहीनी अनेक दिवसांपासून तुंबलेली आहे. परिणामी चेंबरच्या झाकणातून सर्व घाण रस्त्यावर येऊन तळे तयार झाले आहे. मागील दोनतीन दिवसांपासून सांडपाण्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की ते मुख्य सिंहगड रस्त्यावर आले आहे.

धायरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सांडपाण्याचे अक्षरशः तळे तयार झाले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. तीस ते चाळीस फुटांपेक्षा जास्त रुंद असलेला रस्ता दोन्ही बाजूंना केवळ दोन ते तीन फुट शिल्लक असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

यापूर्वीही नागरिकांनी येथील सांडपाण्याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या मात्र अद्याप पालिकेला उपाययोजना करता न आल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

" पूर्ण रस्त्यावर सांडपाणी आलेले आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वाहतूकीसही अडथळा निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने तातडीने ही समस्या सोडविणे आवश्यक आहे."

- विजय मते, नागरिक खडकवासला.

"येथील सांडपाण्याची वाहीनी अत्यंत जुनी असल्याने ती वारंवार तुंबत आहे. अनेक वेळा दुरुस्ती करण्यात आली मात्र उपयोग होत नाही. ही पूर्ण सांडपाणी वाहिनी बदलने आवश्यक असल्याचे मुख्य खात्याला कळविले आहे."

- प्रदीप आव्हाड, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com