

Traffic Police Cracks Down on Auto-Rickshaw Violations
Sakal
धायरी : सिंहगड रस्त्यावर वाढत्या वाहतूक कोंडीसाठी जबाबदार ठरत असलेल्या काही रिक्षा चालकांवर सिंहगड वाहतूक पोलिस विभागाने धडक कारवाई केली आहे. हिंगणे, धायरी फाटा, नवले पूल, वडगाव बुद्रुक, आनंदनगर आणि माणिकबाग परिसरात ही कारवाई करण्यात आली. नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींनंतर ही मोहीम राबवण्यात आली असून नियमभंग करणाऱ्या अनेक रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.