
सिंहगड रस्ता : दोन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पाऊस आणि अचानक उद्भवलेल्या रस्त्याच्या कामांमुळे सिंहगड रस्ता परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. विठ्ठलवाडी परिसरात महापालिकेने अचानक काम सुरू केले. त्यामुळे प्रकाश इनामदार चौकात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.