Pune : प्रामाणिकपणे काम करणा-या कुशल कामगारांची उद्योगांना गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : प्रामाणिकपणे काम करणा-या कुशल कामगारांची उद्योगांना गरज

केडगाव : युवकांनी स्वतः बरोबर जिथे नोकरी करणार आहोत त्यांची प्रगती झाली पाहिजे. अशा विचाराने काम केले पाहिजे. चांगले काम करणा-या कामगारांची उद्योगांना गरज आहे. जे करायचे ते उत्कृष्ठ करा. या जगात अशक्य काही नाही. नोकरी मिळाली नाही तर निराश होऊ नका. प्रयत्न करत रहा. व्यवसाय किंवा नोकरी असे दोन्ही पर्याय तयार असले पाहिजेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्यवसायात उतरावे असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.

भाजपचे कार्यकर्ते तानाजी केकाण व राहुलदादा कुल विचार मंच यांच्यावतीने चौफुला ( ता.दौंड येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कुल बोलत होते. यावेळी नामदेव बारवकर, धनाजी शेळके, गोरख दिवेकर, संजय दिवेकर, अजय गवळी, वसंत साळुंके, संभाजी खडके, डॅा. मधुकर आव्हाड, संजय इनामके, हरिश खोमणे, मोहन म्हेत्रे, अरूण आटोळे आदी उपस्थित होते.

रोजगार मेळाव्यात पुणे, पिंपरी चिंचवड, रांजणगाव, दौंड, बारामती येथील ४० कंपन्यांनी आपले स्टॅाल लावले होते. मेळाव्यात ८२२ बेरोजगारांनी नोंदणी केली. यात मुलींसह महिलांची संख्या लक्षणीय होती. ३०६ युवकांना सायंकाळपर्यंत नियुक्तीपत्र देण्यात आली.

कुल म्हणाले, उद्योगांना आम्ही शासन म्हणून चौकटीच्या बाहेर जाऊन मदत करत असतो तेव्हा युवकांना नोक-या व सीएसआर फंड या दोनच अपेक्षा असतात. दौंडमध्ये सुपीक जमीन, रेल्वे, नदी, खडकवासला व उजनी धरण, कालवा, महामार्ग असतानाही तालुक्याच्या विकासाचा अनुशेष बाकी आहे.

राजकारणाच्या पुढे जाऊन दौंडचा विकास साधण्याचा प्रयत्न चालू आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करताना उद्योगांना पायाभूत सुविधा देणे, सिंचन व पिण्याचे पाणी पुरवणे यावर भर राहणार आहे. जिथे शासन कमी पडते तिथे संस्था व व्यक्तिंनी पुढे आले पाहिजे. ते काम तानाजी केकाण व त्यांचे सहकारी करत आहे. याचे समाधान आहे. रोजगार मेळाव्याचे संयोजन तानाजी केकाण, डी.डी. बारवकर, आबा चोरमले, हरिश्चंद्र खोमणे, संतोष रूपनवर, अशोक नागरगोजे, शहादेव मिसाळ, दादा भंडलकर यांनी केले. दिनेश गडधे यांनी सूत्रसंचालन केले तर आबा चोरमले यांनी आभार मानले.

टॅग्स :Pune NewsBjppuneworker