esakal | Pune: ‘एसआरए’तून विकासकाला डच्चू
sakal

बोलून बातमी शोधा

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

पुणे : ‘एसआरए’तून विकासकाला डच्चू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नोटीस देऊनही प्रकल्प वेळेत मार्गी न लावल्यामुळे एका विकसकाकडून प्रकल्प काढून घेण्याची कार्यवाही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) सुरू केली आहे. त्यानंतर निविदा मागवून या प्रकल्पाचे काम अन्य बांधकाम व्यावसायिकांना देण्यात येणार आहे. पुणे शहरात अशा प्रकारे मुदतीत प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडून पहिल्यांदाच प्रकल्प काढून घेण्याची कार्यवाही प्राधिकरणाकडून करण्यात आली आहे.

लोहियानगर येथील सर्व्हे नंबर १६७ मध्ये ११० झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम एका बांधकाम व्यावसायिकाला प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात आले होते. प्रत्यक्ष जागेवर आरसीसी आणि ब्रीक वॅर्क झाल्यानंतर हे काम गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून थांबले आहे. प्रकल्प वेळेत मार्गी लावावा, यासाठी विकसकाला नोटिसादेखील बजाविल्या. परंतु विकसकाने असमर्थता दर्शविल्यामुळे संबंधित विकसकाकडून हा प्रकल्प काढून घेऊन निविदा मागवून दुसऱ्या विकसकाला देण्याची प्रक्रिया प्राधिकरणाने सुरू केली आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

लोहियानगर येथील प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. संबंधित विकसकाकडून तो प्रकल्प काढून घेऊन निविदा प्रक्रिया राबवून तो अन्य विकसकांना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येथून पुढे अशा प्रकारचे प्रकल्प मार्गी लागावेत, यासाठीदेखील प्राधिकरणाकडून धोरण निश्‍चित करण्यात येत आहे.

- राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए

loading image
go to top