
पुणे : पर्वती पायथ्यालगत असलेल्या जनता वसाहत झोपडपट्टीखाली जागा ताब्यात घेऊन त्या मोबदल्यात ‘टीडीआर’ देण्याच्या प्रस्तावावरून वादंग निर्माण झाल्यानंतर गृहनिर्माण विभागानेच एक पाऊल मागे घेतले आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करावा, तोपर्यंत प्रस्तावावर कोणतीही पुढील कारवाई करू नये, असे आदेश गृहनिर्माण विभागाने झोपडपट्टी पुनर्वसन विभागाला पत्राद्वारे दिले आहेत.