
Smart Village Pune
sakal
पुणे : ग्रामीण भागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित व्हावे, तसेच शेती, आरोग्य व हवामानाशी संबंधित अचूक माहिती मिळावी, यासाठी पुणे जिल्हा परिषद आणि खासगी कंपन्यांच्या संयुक्त पुढाकारातून दोन गावे ‘स्मार्ट डिजिटल व्हिलेज’ म्हणून विकसित केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. काटेवाडी आणि सोरतापवाडी ही दोन गावे स्मार्ट केली जाणार आहे.