Pune : कनेक्ट, उर्ध्वम व ग्रीन फ्रीडमला सोशल इनोव्हेशन पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : कनेक्ट, उर्ध्वम व ग्रीन फ्रीडमला सोशल इनोव्हेशन पुरस्कार

Pune : कनेक्ट, उर्ध्वम व ग्रीन फ्रीडमला सोशल इनोव्हेशन पुरस्कार

पुणे : पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) तर्फे यावर्षीचा सोशल इनोव्हेशन पुरस्कार कनेक्ट, उर्ध्वम एनव्हायरनमेंटल टेक्नोलॉजी आणि ग्रीन फ्रीडम या कंपन्यांना देण्यात आला. हा पुरस्कार अनुक्रमे आदिवासी, ग्रामीण आणि शहरी गटात देण्यात आला. पीआयसीच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समारोप सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून माणदेशी बँक व फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा चेतना गाला सिन्हा उपस्थित होत्या. तसेच पीआयसीचे संचालक अभय वैद्य, पीआयसीच्या सोशल इनोव्हेशन लॅबचे प्रमुख मंदार जोशी,एनर्जी गुरूच्या संस्थापिका गीतांजली पाटील, हॅपी रूटसच्या संस्थापिका रिमा साठे आदी उपस्थित होते.

डिजिटल हेल्थचा ‘कनेक्ट’ ः

 • लिआन थँगवुंग यांची मणिपूरस्थित कंपनी

 • कनेक्टच्या माध्यमातून वैद्यकीय खर्चासाठी तत्काळ सवलत व कर्ज मिळते

 • यासाठी मोफत डिजिटल हेल्थ कार्ड विकसित करण्यात आले.

पुण्यातील उर्ध्वम ः

 • राहुल बाकरे यांनी पुण्यात स्थापन केलेली कंपनी

 • पेटंटेड स्मार्ट रेनवॉटर हार्वेस्टिंग टेक्नोलॉजी व बोअर चार्जर विकसित केले आहे

ग्रीन फ्रिडम ः

 • ईशान नाडकर्णी यांनी स्थापित केलेली मुंबईतील कंपनी

 • ग्रीन फ्रीडमने इम्पॅक्ट नावाचे हेल्थ अ‍ॅप विकसित केले आहे.

हेही वाचा: 'त्रिपुरा'बाबत PM मोदींची घेणार भेट; दिल्ली दौऱ्यापूर्वी ममतांचा एल्गार

आकडे बोलतात...

 • - राज्याचा सहभाग ः २४

 • - अंतिम फेरीत दाखल झालेले अर्ज ः १४०

 • - सामाजिक नवकल्पनांच्या एकूण श्रेणी ः ६

 • - निवड झालेले स्पर्धक ः १८

"भवतालचा समाज आणि जग यांच्याबाबत आजच्या तरुण पिढीकडे विशाल दृष्टिकोन आहे. हेच तरुण उद्योजक भारताला भविष्यात अधिक पुढे घेऊन जातील. देशासाठी ते करत असलेली मेहनत,देत असलेला वेळ,चिकाटी,ऊर्जा आणि जोखीम पत्करण्याची तयारी या सर्व गोष्टी अभिमानास्पद आहेत."

- चेतना गाला-सिन्हा, संस्थापक, माणदेशी फाउंडेशन

loading image
go to top