

Uruli Kanchan Police Assistant Police Sub Inspector Ganesh Dabhade Dies in Pune Solapur Highway Road Accident
esakal
उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावर रस्ता ओलांडत असलेल्या उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली.या अपघातात सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू झाला.शुक्रवारी (ता.१८) रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता.हवेली) हद्दीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर घडली.