‘प्रलंबित सौर प्रकल्प जलद गतीने पूर्ण करा’

‘प्रलंबित सौर प्रकल्प 
जलद गतीने पूर्ण करा’
Published on

पुणे, ता. १३ ः ‘‘राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर यंत्रणा प्राधान्यक्रमाने पूर्ण करावी. तसेच प्रलंबित सौर प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावेत,’’ अशा सूचना अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा महाऊर्जाचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिले.
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) नियामक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, महाऊर्जा महासंचालक ओमप्रकाश बकोरिया, अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर व सर्व विभागांचे महाव्यवस्थापक आदी उपस्थित होते.
सावे म्हणाले ‘‘पीएम कुसुम योजनेमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉल सेंटर सुरू करावे. सध्याच्या इंधन टंचाईवर मात करण्यासाठी विभागांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा,’’ असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com