Pune Fire : पुण्यातील हॉटेलमध्ये सिगारेटने घेतला तरुणाचा जीव! आग लागल्याने भाजला आणि धुरामुळे गुदमरला
Fatal Fire at Orient Hotel, Pune : पुण्यातील सोमवार पेठेतील हॉटेल ‘ओरियंट’च्या खोलीत सिगारेटमुळे लागलेल्या आगीत भाजल्याने व धुरामुळे गुदमरून दौंडच्या ३३ वर्षीय तरुणाचा (मोहित शहा) मृत्यू.
पुणे : सोमवार पेठेतील हॉटेल ‘ओरियंट’मध्ये एका खोलीत लागलेल्या आगीत भाजल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (ता. ७) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.