Pune : पर्यटन महामंडळातर्फे विशेष सवलती

‘एमटीडीसी’ची निवासस्थाने स्वागतासाठी सज्ज
mtdc
mtdcsakal media

पुणे : कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे राज्य सरकारने सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केली आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास (एमटीडीसी) महामंडळानेही पर्यटकांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता पर्यटनाला बहर येणार आहे. गुलाबी थंडीची चाहूल आणि दिवाळीची आगामी सुटी पाहता पर्यटकांची पावले निसर्गाच्या कुशीत थंड हवेच्या ठिकाणी वळू लागली आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने काही दिवसांपूर्वीच नवीन संकेतस्थळ सुरू केले आहे. पर्यटक केंद्रस्थानी ठेवून ‘अतिथी देवो भव’ या नात्याने पर्यटकांना नेहमीच सुविधा देण्यासाठी तयार असलेल्या महामंडळाची नव्याने ओळख होत आहे. बऱ्याच नवीन सुविधांसह संकेतस्थळ अद्ययावत केले आहे. आता नवीन संकेतस्थळावरून तत्काळ आरक्षण करता येणार आहे. पर्यटक निवासे आणि प्रशिक्षित कर्मचारी पर्यटकांचा दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नोकरदार वर्ग आणि पर्यटन व्यावसायिकही दसरा आणि दीपावलीच्या सुटीसाठी पर्यटकांनी नियोजन सुरू केल्याचे दिसून येत आहे. कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यामुळे ऑक्टोबरपासून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पर्यटनाचा हंगामाला गती येणार आहे.

हिवाळी पर्यटनासाठी पर्यटकांकडून महामंडळाच्या पर्यटक निवासांचे बुकिंग सुरू करण्यात येत आहे. तसेच पर्यटकांसाठी अनोख्या सवलती जाहीर केलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. यात आजी-माजी सैनिक, दिव्यांगासाठी तसेच शालेय सहलीसाठी विशेष सवलती दिल्यात. ग्रुप बुकिंगसाठी २० खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन पर्यटक निवासात करण्यात येत आहे. उपाहारगृह, रिसॉर्ट परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच, कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आल्याची माहिती पर्यटन महामंडळाकडून देण्यात आली.

mtdc
Pune : दसऱ्याच्या दिवशी पथ संचलन नाही, केवळ शस्त्रपूजन होणार

एमटीडीसी’ची निवास व्यवस्था

पुणे विभाग : महाबळेश्वर, लोणावळा, माथेरान, माळशेज घाट, पानशेत, कोयनानगर आणि भीमाशंकर.

विदर्भ : ताडोबा अभयारण्य, चिखलदरा, बोधलकसा.

कोकण : तारकर्ली, गणपतीपुळे, वेळणेश्वर, हरिहरेश्वर, कुणकेश्वर

नाशिक विभाग : त्र्यंबकेश्वर, शिर्डी, भंडारदरा

औरंगाबाद विभाग : अजिंठा-वेरूळजवळ बर्दापूर, औरंगाबाद

सिंहगड किल्ला आणि अक्कलकोट येथील रिसॉर्ट पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.

‘एमटीडीसी’कडून पर्यटक निवासाच्या आरक्षणासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू आहे. पर्यटकांचा ओढा लक्षात घेता विशेष सवलती देणार आहे. पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘कॉम्लिमेंटरी ब्रेकफास्ट’ची सुरुवात केली आहे. यासोबतच नावीन्यपूर्ण ‘वर्क फ्रॉम नेचर’ संकल्पनेअंतर्गत काही रिसॉर्टवर वाय-फाय सुविधा पुरविली आहे.

- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com