पत्नीचा खून करून मेव्हणीवर वार; पतीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पतीने पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. ५) रात्री साडेसतरानळी येथे घडला.

पत्नीचा खून करून मेव्हणीवर वार; पतीला अटक

पुणे - पती दारूच्या नशेत पट्ट्याने मारतो, अशी तक्रार सासूकडे केल्याच्या रागातून पतीने पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. ५) रात्री साडेसतरानळी येथे घडला. तसेच मध्यस्ती करणाऱ्या मेव्हणीवर देखील वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. हनुमंत धोंडीबा पवार (वय २२, रा. सूर्यवंशी बिल्डींग, तोरडमल वस्ती, साडेसतरानळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. नंदिनी हनुमंत पवार (वय १९) यांचा खून करण्यात आला. तर मेव्हणी कोमल वैजनाथ लांडगे (वय २२, रा. सूर्यवंशी बिल्डींग, तोरडमल वस्ती, साडेसतरानळी) यांच्यावर वार करण्यात आले आहेत. याबाबत नंदिनी यांच्या आई माणिक शिवाजी कांबळे (वय ५५, रा. सूर्यवंशी बिल्डींग, तोरडमल वस्ती, साडेसतरानळी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनी आणि हनुमंत यांना सहा महिन्यांची मुलगी आहे. तिला सांभाळण्यासाठी नंदिनी यांची आर्इ त्यांच्यासोबत राहत होती. तसेच मोठी मेव्हणीही तेथेच राहण्यास आहे. हनुमंत बिगारी काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. वाद झाल्यानंतर तो पत्नीला वारंवार मारहाण करत होता. घटनेच्या दिवशी हनुमंत हा नंदिनी यांना पट्ट्याने मारहाण करीत होता. हा प्रकार त्यांनी स्वतः आईला सांगितला. याच रागातून दारूच्या नशेत हनुमंतने हे सर्व आईला काय सांगत आहेस, तुला आता सोडतच नाही असे म्हणत चाकूने पत्नीच्या छातीवर, पोटावर वार करून तिचा खून केला. याच दरम्यान बहिणीला वाचविण्यासाठी गेलेल्या कोमल यांच्यावरही हनुमंत यांनी वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करत गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, निरीक्षक अरविंद गोकुळे, विश्वास डगळे यांनी भेट दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त सोमनाथ पडवळकर करत आहेत.

Web Title: Pune Stabs Killing Wife Husband Arrested Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top