पुणे स्थानकाचा भार कमी होणार; शिवाजीनगरला लोकलसाठी नवी लाइन

पुणे स्टेशनवरचा भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे.
Shivajinagar Railway Station
Shivajinagar Railway Stationsakal
Summary

पुणे स्टेशनवरचा भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे.

पुणे - शिवाजीनगर स्टेशनवर लोकलसाठी नवी लाइन बांधली जाणार आहे. फलाट एकच्या पाठीमागील बाजूस ही लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. याला यापूर्वीच मंजुरी मिळाली असून, आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

तीनशे मीटर लांबीची ही लाइन आहे. यासाठी किमान एक कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या लाइनसाठी दोन फूट खोल खड्डे घेण्यात आले आहेत. ही लाइन पूर्ण होताच शिवाजीनगर स्टेशनवरून लोकलची संख्या वाढणार आहे. शिवाय, शिवाजीनगर हे लोकलसाठी टर्मिनेट स्टेशन होणार असल्याने येथूनच लोकल सुटेल व थांबेल. यामुळे पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या लोकलची संख्या कमी होईल.

पुणे स्टेशनवरचा भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. हडपसर टर्मिनल, खडकी टर्मिनल यासह शिवाजीनगर स्टेशनवरची ईएमयू (लोकल) लाइनदेखील याचाच भाग आहे. नव्या लाइनवर लोकल थांबून राहील. त्यामुळे एक प्रकारची ती स्टॅब्लिंग लाइनसारखा त्याचा वापर होईल. परिणामी, एक फलाट मोकळा राहील.

शिवाजीनगरवरून १२ लोकल

सध्या पुणे स्टेशनवरून पुणे ते लोणावळादरम्यान दररोज २६ फेऱ्या होत आहेत. पूर्वी ४२ फेऱ्या होत होत्या. येणाऱ्या काळात लोकल फेऱ्या वाढणार आहेत. त्यावेळी पुणे स्टेशनवरचा लोकलचा भार कमी करण्यासाठी काही लोकल आता पुणेऐवजी शिवाजीनगर स्टेशनवरून सुटतील व तिथेच आपला प्रवास संपणार आहे. येत्या काळात शिवाजीनगर स्टेशनवरून किमान १० ते १२ लोकल सुटतील.

प्रवाशांना फायदा...

अनेकदा शिवाजीनगर स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या लोकलच्या प्रवाशांना पुण्याहूनच लोकल भरून येत असल्याने त्यांना लोकलमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नाही. आता शिवाजीनगर येथून लोकल सुटणार असल्याने प्रवाशांना लोकलमध्ये जागा मिळण्यास काही अडचण येणार नाही.

शिवाजीनगर स्टेशनवर लोकलसाठी नवीन लाइन बांधण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या तीन महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुणे स्टेशनवरचा ताण कमी होण्यास निश्चितच फायदा होईल.’’

- बी. के. सिंह, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com