
Pune Police Bust Mobile Snatching Gang, 19 Phones Recovered, 3 Arrested
Sakal
पुणे : पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांकडील मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा बंडगार्डन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघा सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १९ मोबाईल आणि एक दुचाकी असा तीन लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने शहरातील विविध भागांत आठ गुन्हे केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.