Pune Station UpdateSakal
पुणे
Pune Station Update : पुणे स्थानकावर 'एम यूटीएस' सेवा सुरू; तिकीटासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही
Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावर ‘एम-यूटीएस’ स्मार्ट तिकीट सेवा कार्यान्वित झाली असून, प्रवाशांना आता अवघ्या १०-१२ सेकंदांत जनरल तिकीट मिळणार आहे.
प्रसाद कानडे
पुणे : सण, उत्सवांच्या काळात आपल्या गावी जाण्यासाठी प्रवाशांना तासन्तास तिकीट खिडकीवर उभे राहावे लागते. आता, मात्र त्यांना रांगेत थांबण्याची आवश्यकता नाही. कारण रेल्वे प्रशासन आता पुणे स्थानकावर पहिल्यादांच ‘एम यूटीएस’ ही सुविधा सुरू करीत आहे. याद्वारे प्रवाशांना अवघ्या १० ते १२ सेकंदात जनरल तिकीट मिळणार आहे. तिकीट निरीक्षक, बुकिंग क्लार्क यांच्याकडे ‘एम- यूटीएस’ नावाचे मशिन असणार असून, याद्वारे प्रवाशांना तिकीट दिले जाणार आहे.

