विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार पेठेत घडली.

Student Suicide : विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

पुणे - बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार पेठेत घडली. हि घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सुदर्शन मारुती झरे (वय 18, रा. शनिवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन हा त्याचे आई-वडीलांसमवेत शनिवार पेठेत राहण्यास होता. त्याचे आई-वडील नोकरीस आहेत. नेहमीप्रमाणे दोघेही सोमवारी कामाच्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी सुदर्शन घरी एकटाच होता. सायंकाळी ते घरी परतले, तेव्हा दरवाजा आतुन बंद होता.

त्यांनी आवाज दिला, मात्र आतुन प्रतिसाद न मिळाल्यामुळे दरवाजा तोडून कुटुंबीयांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी सुदर्शनने हा बाथरुमध्ये गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससुन रुग्णालयात पाठविला. दरम्यान, सुदर्शनच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. विश्रामबाग पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलिस करीत आहेत.

टॅग्स :punestudent