Students and activists in Pune celebrated following claims about the resignation of the Union Education Minister during the ongoing education-related protests.
Sakal
प्रज्वल रामटेके,
पुणे : ‘भारत माता की जय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘जय भीम’, ‘छात्र एकजुटीचा विजय असो’, ‘शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा गगनभेदी घोषणा... हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि एकमेकांना ‘मेलोडी’ चॉकलेट भरवत चेहऱ्यावर झळकणारा विजयाचा आनंद... अशा उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जल्लोष साजरा केला. हा केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याचा आनंद नसून, देशाच्या शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या प्रदीर्घ लढ्याची सुरुवात असल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.