
पुणे : भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) पदवी अभ्यासक्रम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ‘त्यांनी’ इयत्ता आठवीपासूनच प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. जेईई मेन, त्यानंतर जेईई ॲडव्हान्समध्ये देशपातळीवर चांगले स्थान पटकाविले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेत १०० पर्सेंटाइल मिळवत यश संपादन केले आहे.