Pune: एकरकमी एफआरपी न दिल्यास आंदोलन सुरूच राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

frp

पुणे : एकरकमी एफआरपी न दिल्यास आंदोलन सुरूच राहणार

पुणे : साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी रास्त किफायतशीर रक्कम (एफआरपी) द्यावी, या मागणीवर शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी ठाम राहिले. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी न दिल्यास आंदोलन सुरूच राहील, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला. राज्यात साखर कारखान्यांमधील गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना झाला आहे.

तरी काही साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप प्रलंबित एफआरपी दिलेली नाही. एफआरपीच्या प्रश्‍नावरून शेतकरी संघटनेने सांगली, सातारा जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर संकुल येथे मंगळवारी (ता. १६) सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. शेतकरी संघटनेचे अनिल पवार, भागवत जाधव, प्रताप पाटील, भैरवनाथ कदम, पोपट मोरे, राजू शेळके, प्रकाश देसाई, बाळासाहेब जाधव, दत्तात्रेय घारगे यांच्यासह अन्य संघटनांचे अन्य पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

हेही वाचा: कंगना पुन्हा बरळली; स्वातंत्र्य, भीक आणि नेताजी बोस-भगतसिंगांबद्दल म्हणाली...

एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आलेला नाही. त्यांच्याबाबत पुढे काय निर्णय घ्यावा. प्रलंबित एफआरपीबाबत कायदेशीर बाबी तसेच विनापरवाना कारखाने सुरू करणाऱ्या कारखान्यांबाबत कारवाई अशा मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

loading image
go to top