कंगना पुन्हा बरळली; स्वातंत्र्य, भीक आणि नेताजी बोस-भगतसिंगांबद्दल म्हणाली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंगना पुन्हा बरळली; स्वातंत्र्य, भीक आणि नेताजी बोस-भगतसिंगांबद्दल म्हणाली...

कंगना पुन्हा बरळली; स्वातंत्र्य, भीक आणि नेताजी बोस-भगतसिंगांबद्दल म्हणाली...

कंगना राणावत आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिची अत्यंत बेजबाबदार अशी वक्तव्य सध्या वादग्रस्त होत आहेत. ती सिने अभिनेत्री असल्याकारणाने तिच्या या विधानांना पुरेशी प्रसिद्धी देखील मिळत आहे. खासकरुन इतिहासाबद्दलची तिची विधाने सध्या चर्चेत आहेत. कंगनाने आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं नसून भीक मिळाली असल्याचं वक्तव्य अगदी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. कंगनाला नुकताच पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर कंगनाची ही बेताल वक्तव्य गंभीर मानली जात आहेत. दुसरीकडे आता कंगनाने पुन्हा एकदा इतिहासाबाबतचे आपले ज्ञान आणि मते मांडली आहेत.

हेही वाचा: दहा वर्षाच्या चिमुरडीवर घरातल्या नोकरानेच केला बलात्कार; गंभीर जखमी

आज मंगळवारी कंगना राणावतने एका जुन्या वृत्तपत्रामधील एक लेख शेअर करुन लिहलंय की, तुम्ही एकतर गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींची समर्थक. तुम्ही एकावेळी दोन्हीही असू शकत नाही. निवड करा आणि ठरवा. तिने जो जुना लेख शेअर केला आहे तो 1940 सालातला असून त्याचे शिर्षक आहे की, "Gandhi, others agreed to hand over Netaji.” अर्थात 'गांधी आणि इतरांनी नेताजींना हवाली करण्याचे मान्य केले.'

कंगणाने म्हटलंय की, ज्यांच्याकडे ब्रिटीशांच्या दमनशाहीविरोधात लढण्याचं धैर्य नव्हतं आणि जे सत्तेचे भुकेले होते त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटीशांकडे सुपूर्द करण्याचं काम केलंय. तिने यासंदर्भात महात्मा गांधींवर टीका करताना म्हटलंय की, हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला शिकवलं की, एखाद्याने तुम्हाला थप्पड लगावली तर त्याच्यासमोर दुसरा गाल पुढे करा आणि या मार्गाने तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. मात्र, या मार्गाने स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. तुमचे आदर्श विचारपूर्वक निवडा, असं देखील तिनं म्हटलंय.

हेही वाचा: हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी; वाचा काय म्हणालं हायकोर्ट?

कंगणाने असा दावा केलाय की, गांधींनी कधीच भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा दिला नाही. त्यामुळे तुम्ही नेमका कुणाला पाठिंबा देत आहात, हे पाहणं आवश्यक आहे. कारण अशांना तुमच्या स्मृती पटलामध्ये ठेवणे आणि दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शुभेच्छा देणं पुरेसे नाही. किंबहुना ही कृती नुसती मुकी नसून ती अत्यंत बेजबाबदार आणि वरवरची आहे. एखाद्याला त्याचा इतिहास आणि त्यांचे नायक माहित असलेच पाहिजेत,” असंही ती म्हणाली आहे.

loading image
go to top