Pune : औंध येथील एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sucide

Pune : औंध येथील एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीची आत्महत्या

पुणे : औंध येथील तरुणीचा एकतर्फी प्रेमातून खून करुन पसार झालेल्या संशयित आरोपी असलेल्या तरुणाने मुळशी तालुक्यातील टाटा धरणाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रतीक ढमाले असे आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर श्वेता रानवडे असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. बुधवारी दुपारी श्वेता व तिची बहीण अशा दोघीजणी औंध भागातून निघाल्या होत्या.

त्यावेळी दबा धरून बसलेल्या प्रतीकने तिच्यावर चाकूने वार केले होते. या घटनेनंतर औंध परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते . दरम्यान, चतु:शृंगी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला. यावेळी प्रतीकच्या मागावर पोलिसांची पथके होती. गुरवारी सकाळी प्रतीकने मुळशी तालुक्यातील टाटा धरणाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आले. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.