Pune Traffic News : सूस-लवळे रस्त्यावरील वाहतूक उद्या सुरळीत सुरू राहणार; रस्ता बंद असल्याचा व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा

Sus Lavale Road Traffic : पुण्यातील सूस ते लवळे रस्ता सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे सूस, लवळे आणि परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम व चिंता निर्माण झाली होती.
Sus Lavale Road Traffic Update for 23 November

Sus Lavale Road Traffic Update for 23 November

esakal

Updated on: 

पुण्यातील सूस ते लवळे रस्त्यावरील वाहतुकीबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा रस्ता उद्या सोमवार (ता. २३ नोव्हेंबर) रोजी वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, हा व्हिडिओ चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...