

Pune Doctors Remove Rare Hairball from Girl's Stomach
Sakal
पुणे : लवळे येथील सिंबायोसिस रुग्णालयात डॉक्टरांनी दुर्मीळ आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे दहावर्षीय मुलीच्या पोटातून केस आणि कापसाच्या दोऱ्याचा २८० ग्रॅम वजनाचा गोळा काढला. हा गोळा तिच्या पोटातून लहान आतडे आणि पित्ताशयापर्यंत पोहोचला होता. ‘रपुंझेल सिंड्रोम’ या विकारामुळे ही मुलगी केस आणि दोरा गिळण्याच्या सवयीने त्रस्त होती.