पुणे : चमकोगिरीमुळे पुणे विद्रूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Illegal-Flex

पुणे : चमकोगिरीमुळे पुणे विद्रूप

पुणे : रस्ता, पादचारी मार्गावर चार बांबूचा टेकू घ्यायचा. तेथेच पथदिव्याला तारा किंवा काथ्याने फ्लेक्स बांधून टाकायचा. दादा, भाऊ, मामा, साहेब, अण्णा अशांना भरभरून शुभेच्छा द्यायच्या. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी आली की बेकायदा फ्लेक्स लावून स्वतःची चमकोगिरी आणि शहराचे विद्रूपीकरण करायला तयार होणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांवर, समाजसेवकांवर महापालिकेने कारवाई करून चार लाख ८० हजार रुपयांचा दंड गेल्या सहा महिन्यांत वसूल केला. तरीही फ्लेक्सची हौस कमी होत नसल्याने चौक, रस्ते घाण करण्याचे उद्योग सुरू आहेत.

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागातर्फे केवळ मोठे लोखंडी होर्डिंग लावण्यास परवानगी दिली जाते. पण त्यासाठी होर्डिंग व्यावसायिकास भाडे देऊन त्यावर जाहिरात करण्यापेक्षा चौकाचौकात बेकायदेशीर फ्लेक्स, बोर्ड, पोस्टर लावल्यावरच भर दिला जातो. महापालिकेच्या अतिक्रमण व आकाश चिन्ह विभागातर्फे त्यावर कारवाई केली जाते. यापूर्वी केवळ फ्लेक्स जप्त केले जात होते. पण नव्या धोरणानुसार एका फ्लेक्सला एक हजार रुपयांचा दंड व १० पेक्षा जास्त फ्लेक्स, झेंडे, बोर्ड असतील तर पाच हजाराचा दंड लावला जात आहे.

ऑक्टोबर २०२१ ते १७ मार्च २०२२ या पाच महिन्यांच्या काळात महापालिकेने २० हजार ३६५ फ्लेक्स, १७ हजार ७८१ बॅनर, ३६ हजार ४२५ पोस्टर, ७ हजार ३६६ झेंडे, १७ हजार ६१८ किऑक्सवर कारवाई केली आहे. यामध्ये ४ लाख ८० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ऑक्टोबर २०२१ ते १७ मार्च २०२२ पर्यंतची कारवाई

  • बोर्ड ३२,६२०

  • बॅनर १७,७८१

  • फ्लेक्स २०,३६५

  • झेंडे ७,३६६

  • पोस्टर ३६,४२५

  • किऑक्स १७,६१८

  • इतर ९,६०७

  • एकूण १,४१,७८२

  • दंड रक्कम ४,८०,५००

मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालयाकडून अनधिकृत फ्लेक्स, बॅनरवर वारंवार कारवाई केली जात आहे. नव्या धोरणानुसार दंडही वसूल केला जात असून, आत्तापर्यंत ४ लाख ८० हजार रुपयांचा दंड केला आहे. कारवाई अधिक कडक करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- विजय लांडगे, प्रमुख, आकाशचिन्ह विभाग

Web Title: Pune Tactical Action Illegal Flex Fines Recovered

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top