esakal | पुणे: तळेगाव ढमढेरे गाव होणार 'प्रकाशमय'
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: तळेगाव ढमढेरे गाव होणार 'प्रकाशमय'

पुणे: तळेगाव ढमढेरे गाव होणार 'प्रकाशमय'

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) या गावातील गेली दोन महिने विद्युत खांबावरील स्ट्रीट लाईटचे दिवे बंद असल्याने गाव पूर्ण अंधारात आहे. सध्या गौरी- गणपती उत्सव सुरु असून, खांबावरील दिवे बंद आहेत. अंधारामुळे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून, परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे.

हेही वाचा: विसर्जनासाठी शिक्रापूर ग्रामपंचायत सज्ज, तीन विसर्जन हौद तयार

ग्रामपंचायतीचे वीजबिल थकल्याने वरिष्ठ पातळीवरूनच खांबावरील वीज बंद करण्यात आली आहे. उत्सवात गाव अंधारात असल्याने खांबावरील पथदिवे त्वरित बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. सोमवारी सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे यांनी गावातील स्ट्रीट लाईट कनेक्शन त्वरित चालू करण्याची पत्राद्वारे महावितरणकडे मागणी केली आहे.

यासंदर्भात बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ व विश्वासकाका ढमढेरे यांनी महावितरणचे विभागीय अधिकारी नितीन महाजन यांच्याकडे गणपती उत्सवानिमित्त गावातील स्ट्रीट लाईट सुरु करण्याची विनंती केली. महाजन यांनी कनिष्ठ अभियंता दादा बारवकर यांना स्ट्रीट लाईट त्वरित सुरु करण्याची सूचना केली. त्यानुसार दोन दिवसात सर्व स्ट्रीट लाईट चालू करून, गाव प्रकाशमय केले जाईल असे आश्वासन बारवकर यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

यावेळी कनिष्ठ अभियंता बारवकर यांची भेट घेऊन विजेविषयी चर्चा केली. यावेळी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, ग्रामपंचायत सदस्य राहुल भुजबळ, बाळासाहेब लांडे, वसंत भुजबळ, विजय ढमढेरे आदी उपस्थित होते.

loading image
go to top