Pune : जिल्ह्यातील दुष्काळी तालुके; यंदा भर उन्हाळ्यात टँकरमुक्त

दोन दशकानंतर पहिलीच वेळ,अन्य तीन तालुक्यात पाच वर्षांपासून टँकर बंद
pune
punesakal

पुणे - जिल्ह्यातील कायम दुष्काळी समजले जाणारे बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि शिरूर हे पाच तालुके यंदाच्या भर उन्हाळ्यातही टॅंकरमुक्त आहेत. या पाचही तालुक्यातील एकाही गावाला किंवा वाडी-वस्तीला आतापर्यंत तरी टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली नाही. गेल्या दोन दशकानंतर यंदा पहिल्यांदाच या तालुक्यात एकही टँकर सुरू करावा लागलेला नाही. याशिवाय मावळ, मुळशी आणि वेल्हे या तीन तालुक्यात मागील पाच वर्षांपासून टँकर पूर्णपणे बंद झालेले आहेत.

pune
Mumbai : सेन्सेक्सची सलग चौथी वाढ; सेन्सेक्स १२२ अंश वाढला

सद्यःस्थितीत जिल्ह्यातील एकूण नऊ तालुके टँकरमुक्त आहेत. केवळ उर्वरित चार तालुक्यात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. टँकरमुक्त झालेल्या एकूण नऊ तालुक्यांमध्ये दुष्काळी पाच तालुक्यांसह हवेली, मावळ, मुळशी आणि वेल्हे या अन्य चार तालुक्यांचा समावेश आहे. सध्या केवळ आंबेगाव, जुन्नर, खेड आणि भोर या चारच तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर सुरु झालेले आहेत.

pune
Ncp Sharad Pawar Mumbai : सुमारे ५० हजार पुस्तिका काढणार ; राज्य सरकारच्या विरोधात निकाल वाचनाची राष्ट्रवादीची मोहीम..!

पुणे जिल्हा यंदा तीव्र पाणीटंचाईच्या गडद छायेतून पूर्णपणे बाहेर आला असल्याचे दिसून आले आहे. दोन दशकांपूर्वी म्हणजेच सन २००३ आणि २००४ मध्ये जिल्ह्यातील एकूण पिण्याच्या पाण्याच्या टँकर्सची संख्या ही साडेतीनशेच्या घरांत होती. यापैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच दोनशेहून अधिक टँकर्स हे फक्त दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर आणि पुरंदर या पाचच तालुक्यात असत, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

pune
Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची माहिती, ट्राफिकमधून होणार सुटका!

जिल्ह्यात फक्त ३२ टँकर सुरु

दरम्यान, यंदाच्या भर उन्हाळ्यातसुद्धा पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये मिळून फक्त ३२ टँकर सुरु झाले आहेत. एकूण टॅंकर्सपैकी सर्वाधिक सर्वाधिक १२ टॅंकर हे एकट्या आंबेगाव तालुक्यात सुरु आहेत. जुन्नर तालुक्यात दहा, खेडमध्ये नऊ तर, भोर तालुक्यात केवळ एक टँकर सुरु आहे. या सर्व टॅँकर्सच्या माध्यमातून १६ गावे आणि ५० वाड्या-वस्त्यांमधील १८ हजार ५४० लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com