पदवीधर निवडणुकीत महाविकासची 'आघाडी'; मतमोजणी अद्याप सुरुच

mahavikas
mahavikas

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची मतमोजणी सुरु आहे. आता पर्यंत 1 लाख वीस हजार मतांची मोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये वैध आणि अवैध मते निश्चित करण्याचे काम झाले आहे. उर्वरित मते आद्याप मोजून व्हायची आहे. त्यानंतर कोटा निश्चित होईल. त्यास किमान रात्रीचे बारा वाजतील असं सांगण्यात येत आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यावर आघाडी घेतली आहे. लाड यांना सुमारे 10 हजार मतांची आघाडी असल्याची माहिती आहे. कॉंग्रेसचे जयंत आसगावकर हे शिक्षक मतदारसंघातून सुमारे चार हजार मतांनी पुढे असल्याची माहिती आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सावंत दुसऱ्या स्थानावर, तर भाजपचे जितेंद्र पवार हे तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com