

Teacher's union protest decision
sakal
सोमेश्वरनगर : टीईटीची सक्ती, ऑनलाईन कामांचा रतीब, १५ मार्चचा संचमान्यतेचा आदेश अशा शिक्षणव्यवस्था खिळखिळी करणाऱ्या प्रश्नांसाठी आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांनी वज्रमूठ बांधली आहे. एकेकटे लढण्यापेक्षा एकत्र आवाज उठविण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुषंगाने 'सर्व संघटना समन्वय समिती'च्या वतीने 24 नोव्हेंबरला 'शाळा बंद' आंदोलन पुकारले असून त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे व शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी दिली.