

पुणे, ता. ५ : सिंगापूरमधील आधुनिक शिक्षण पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या ४५ शिक्षकांची आणि तीन केंद्रप्रमुखांची निवड करण्यात आली आहे. हे शिक्षक ‘शिक्षणदूत’ म्हणून जिल्ह्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षित करतील, अशी माहिती अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या १,१८७ शिक्षकांनी या उपक्रमासाठी लेखी चाचणी दिली होती. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सहभागातून लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा बहुस्तरीय प्रक्रियेतून १५० जणांमधून अंतिम ४८ जणांची निवड करण्यात आली. तालुकानिहाय प्रतिनिधित्व आणि गुणवत्ता यांचा यात विचार करण्यात आला आहे.
याबाबत वीरधवल जगदाळे म्हणाले की, शिक्षकांना जागतिक दर्जाच्या पद्धतींचा अनुभव मिळाल्यास त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला होईल. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी स्पष्ट केले की, हा केवळ दौरा नसून जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तावाढीचा व्यापक प्रयत्न आहे. सिंगापूरमधील ज्ञान स्थानिक शाळांच्या गरजेनुसार अध्यापनात उतरविण्याची जबाबदारी या शिक्षकांवर असेल.
दौऱ्यासाठी निवड झालेले शिक्षक -
आंबेगाव - नितीन बर्वे, सावकार अरगडे, कामिनी थोरात
बारामती - सुगत टोपरे, पंढरीनाथ कामठे, प्रीतम सातपुते, प्रवीण कुलकर्णी
भोर - स्वाती महानगरे, मारुती चौधरी, सुवर्णा कापरे
दौंड - अमर खेडेकर, दत्तात्रेय बारवकर, आदिनाथ बनकर, सीमा महाडिक, सोनाली गायकवाड
हवेली - शंकर बडे, सुवर्णा पवार
इंदापूर - दत्तात्रेय छगनराव शिंगाडे, सागर भोसले, दत्तात्रेय नवनाथ शिंगाडे, संदीप येवले
जुन्नर - नीलेश टिकेकर, धनश्री दाते, रश्मी डुंबरे, अमर केदारी
खेड - अनिता परदेशी, सुनील मापारी, शीतल पाचारणे, दीपक रेटावडे, मंगल काटले, विशाल बार्वेकर
मावळ - मनीषा उघडे, दीपाली अंगिर, मैना सरवदे, श्रीनिवास शिंदे
मुळशी - उज्वला नारायणकर, माधवी चिंबालकर
पुरंदर - चंद्रकांत घरमालकर, विद्या म्हेत्रे
शिरूर - अर्चना जगताप, संतोष वेताळ, गणेश वाढे, मीनाक्षी अनोसे
राजगड - शीतल जाधव, पुरुषोत्तम कुलकर्णी
केंद्रप्रमुख - अंकुश बढे (आंबेगाव), कमलाकांत मुंढे (जुन्नर), शोभा होळकर (बारामती)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.