

पुणे, ता. २४ : लहान भावाला शिवीगाळ केल्याच्या वादातून एका १८ वर्षीय तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरात सोमवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ओम वैद्य (वय १९) आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारावर दाखल केला आहे. अनिकेत सुरेश गाडे (वय १८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेतने ओमच्या लहान भावाला शिवीगाळ केली होती. याच रागातून सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ओम आणि त्याच्या साथीदाराने अनिकेतवर शस्त्राने हल्ला केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.