

India Book of Records Recognises Pune Teen Vedant Wagh as Youngest Rider to Complete Golden Quadrilateral Motorcycle Journey
sakal
धनकवडी : जिद्द, चिकाटी आणि साहसाच्या जोरावर १८ वर्षीय वेदांत चंद्रशेखर वाघ याने मोटारसायकलवरून भारताचा सुवर्ण चतुष्कोण (गोल्डन क्वाड्रिलॅटरल) मार्ग एकट्याने पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. अवघ्या १३ दिवसांत ६ हजार ४१.६२ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत त्याने ''मोटारसायकलवरून गोल्डन क्वाड्रिलॅटरल मोहीम पूर्ण करणारा सर्वात तरुण व्यक्ती'' हा मान मिळवला आहे. त्याच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे, हा विक्रम केला तेव्हा वेदांतचे वय अवघे १८ वर्षे ८ महिने आणि २० दिवस होते.