Pune Temperature
esakal
गेल्या काही दिवसांपासून हवामानात झालेल्या बदलांमुळे शहरातील तापमानात मोठी वाढ झाली होती. मात्र, सोमवारी (ता. ८) किमान तापमानात लक्षणीयरीत्या घट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील तीन दिवसांत किमान तापमानात आणखी घट होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शहरातील थंडी कायम राहणार असल्याची शक्यता आहे.