

Pune Temperature Remains Stable
Sakal
पुणे : रात्रीच्या वेळी थंडीत किंचित वाढ झाली असली, तरी गेल्या दोन दिवसांपासून शहरातील तापमान स्थिर आहे. शहरातील किमान तापमानाचा पारा १५ ते २० अंशावर आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत तापमान स्थिर राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.