पुणे : सदनिकाधारकाला मिळणार पार्किंगचा ताबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

car parking
पुणे : सदनिकाधारकाला मिळणार पार्किंगचा ताबा

पुणे : सदनिकाधारकाला मिळणार पार्किंगचा ताबा

पुणे - सदनिका (Flat) घेताना झालेल्या करारानुसार पार्किंग (Parking) न मिळाल्याने घर मालकाला (Home Owner) ग्राहक आयोगाने (Customer Commission) दिलासा दिला आहे. संबंधित सदनिकाधारकाला करारात ठरल्याप्रमाणे पार्किंगचा ताबा देण्यात यावा, असे आदेश आयोगाने विकसकाला दिला आहे.

अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य अनिल जवळेकर आणि शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला. याबाबत हेमंत आणि ज्योती जगताप यांनी व्ही. एम. ग्रुपचे विजय तापडिया यांच्याविरोधात आयोगात तक्रार दाखल केली होती. जगताप दांपत्याने ग्रुपच्या आंबेगावमधील एका प्रकल्पात ३२ लाख ४९ हजार रुपयांची सदनिका बुक केली होती. यात किमतीत त्यांना पार्किंग देण्यात येर्इल, असा करार त्यांच्यात झाला होता.

हेही वाचा: सावधान! हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची सेवा शुल्कच्या नावाखाली बेकायदा होतेय लूट

मात्र, प्रत्यक्षात सदनिकेचा ताबा देताना त्यांना पार्किंग आणि सदनिकेच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही. त्यामुळे जगताप यांनी ग्रुप विरोधात पोलिसांत आणि आयोगात तक्रार दाखल केली, असे निकालात नमूद आहे. आयोगात जगताप यांच्यावतीने ॲड. ज्ञानराज संत आणि ॲड. जयश्री कुलकर्णी यांनी काम पाहिले. पार्किंग न मिळाल्याने झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल नुकसान भरपार्इ म्हणून पाच लाख रुपये, ५० हजार रुपये तक्रारीचा खर्च तसेच पार्किंगची जागा न मिळाल्याने पाच लाख रुपये मिळावी, अशी मागणी जगताप यांनी आयोगातील तक्रारी केली होती.

विकसकाने निकाल झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत जगताप यांना कार पार्किंगचा ताबा द्यावा. तसेच पार्किंग न दिलेल्या झालेल्या त्रासाबद्दल १५ हजार रुपये, शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल १० हजार रुपये आणि तक्रार खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्याचे आदेश आगोयाने दिले.

Web Title: Pune Tenant Will Get Possession Of The Parking Lot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top