

Evidence of Suspicious Documents Burnt in Pune
Sakal
पुणे : दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेला संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर कोंढव्यातील कौसरबागमध्ये कुराण, हदीस, खिलाफत या विषयांवर आक्रमक उपदेश द्यायचा. त्याला अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या साथीदारांनी या ठिकाणावरून काही संशयित पुस्तके-प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे एकत्र केली. त्यानंतर ती सर्व कागदपत्रे काळेपडळ येथील एका धार्मिक स्थळाच्या मोकळ्या जागेत जाळल्याचे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात निष्पन्न झाले आहे.