Terrorist : पुण्यातील दहशतवाद्यांचे रतलाम मॉड्यूलशी कनेक्शन; ‘एटीएस’चे सदानंद दाते यांची माहिती

‘कोथरूड परिसरात अटक केलेल्या दहशतवादी प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर आहे. सर्व शक्यतांवर तपास सुरू असून, दोन दिवसांत महत्त्वाचे धागेदोरे हाती येतील.
Terrorist
TerroristSakal

पुणे - ‘कोथरूड परिसरात अटक केलेल्या दहशतवादी प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर आहे. सर्व शक्यतांवर तपास सुरू असून, दोन दिवसांत महत्त्वाचे धागेदोरे हाती येतील. तसेच, दहशतवाद्यांचे राजस्थानच्या रतलाम मॉड्यूलशी कनेक्शन समोर आले आहे.

या सर्व लिंक जोडून दहशतवाद्यांचे मॉड्यूल उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे’, अशी माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी दिली.

पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरात १८ जुलै रोजी पहाटे दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास ‘एटीएस’कडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दाते यांनी बुधवारी (ता. २६) तपासाबाबत आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. मिठानगर, कोंढवा, मूळ रा. हरमाला कुलकुंडी, रतलाम, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार महम्मद शहनवाज आलम (वय ३१) पसार झाला असून, ‘एटीएस’कडून त्याचा शोध सुरू आहे. या आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीए) कलमवाढ करण्यात आली आहे.

‘‘या प्रकरणी दोघांशिवाय कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. देशातील विविध भागात ‘एटीएस’ची पथके रवाना केली आहेत’’, असे दाते यांनी सांगितले. दरम्यान, दहशतवादी मागील दीड वर्षांपासून कोंढव्यात वास्तव्यास होते. परंतु त्याची गुप्तचर यंत्रणांना माहिती नव्हती?, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले.

पुणे, साताऱ्यासह कोल्हापूरमध्येही तपास

पुण्यात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केली आहे. या दोघांनी दहशतवादी कारवायाचे प्रशिक्षण घेतले आहे. दोघांच्या घराच्या झडतीत सापडलेली पांढरी पावडर ही स्फोटक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच, त्यांनी घातपात करण्यासाठी काही ठिकाणांची रेकीही केली होती, ही बाब ‘एटीएस’ने मंगळवारी न्यायालयास दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाली आहे. या दोघांना कोंढव्यात भाडेतत्त्वावर घर कसे मिळाले? तसेच, सातारा आणि कोल्हापूरमधून त्यांना कोणी मदत केली आहे का? याचा ‘एटीएस’ तपास करीत आहे.

दहशतवाद्यांचे रतलाम मॉड्यूल कनेक्शन

राजस्थानच्या निंबाहेरामधील इम्रानच्या फार्म हाऊसमधून झुबेर, अल्तमास आणि सैफुल्ला हे तिघे दहशतवादी ३० मार्च २०२२ रोजी स्फोटक सामग्री घेऊन जयपूरला निघाले होते.

या तिघांना राजस्थान ‘एटीएस’च्या पथकाने रतलाममधून अटक केली होती. त्यावेळी रतलाम मॉड्यूलचा मास्टरमाइंड इम्रान पसार झाला होता. या अनुषंगाने राजस्थान आणि मध्यप्रदेश ‘एटीएस’सह आता महाराष्ट्र ’एटीएस’चे पथकही तपास करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com