

TET Exam on Sunday; Results in 45-60 Days
Sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (ता. २३) राज्यात ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ होणार आहे. परीक्षा झाल्यानंतर अवघ्या ४५ ते ६० दिवसांत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर करण्याच्यादृष्टीने तातडीने पावले उचलली जातील, असे परीक्षा परीषदेने म्हटले आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यात रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. त्या अनुषंगाने राज्य परिषदेने पत्रकार परिषदेत आयोजन केले होते. यावेळी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे, आयुक्त अनुराधा ओक आदी उपस्थित होते. यंदा टीईटी परीक्षेसाठी एकूण चार लाख ७५ हजार ६६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर एक) आणि सहावी ते आठवीसाठी (पेपर दोन) सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक आणि शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.